पवित्र पोर्टल मध्ये २१ हजारापेक्षा जास्त शिक्षकांची भरती | २१ हजार शिक्षक आपला पसंतीक्रमांक करणार लॉक...

Pavitra Portal Recruitment

Pavitra Portal Recruitment 2024 : पवित्र प्रणालीमार्फत शिक्षण सेवक/शिक्षक पदभरती सन २०२२ | महाराष्ट्र राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये पवित्र पोर्टल या संगणकीय प्रणालीद्वारे शिक्षण सेवक/शिक्षक पदभरतीसाठी "शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी-२०२२" चे ऑनलाईन पद्धतीने आयोजन करण्यात आले होते.

Pavitra Portal Recruitment 2024 : "शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी -२०२२" मधील प्राप्त गुणांच्या आधारे राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी व्यवस्थापनाच्या शाळांतील इयता १ ली ते १२ वीकरिता शिक्षण सेवक/शिक्षक या रिक्त पदांची भरती करण्यात येत आहे. सदर भरती ही त्या त्या व्यवस्थापनामध्ये रिक्त असलेली पदे व त्यासाठीचे शिल्लक आरक्षण इत्यादी बाबी विचारात घेऊन ८० टक्के पर्दासाठी करण्याचे शासनादेशानुसार नियोजित आहे. शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी २०२२ नुसार पवित्र पोर्टलमार्फत शिक्षक पदभरतीसाठीच्या रिक्त जागांसाठी प्राधान्यक्रम जनरेट व लॉक करण्यासाठी अधिसूचना जाहीर झालेली आहे. इच्छुक उमेदवारांनी लॉक करण्यासाठी आणि संपूर्ण माहिती पाहण्यासाठी हा लेख शेवटपर्यंत वाचा.

Pavitra Portal Recruitment

Pavitra Portal Recruitment 2024 : अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा.

शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी-२०२२ ही दिनांक २२/०२/२०२३ ते दिनांक ३/३/२०२३ या कालावधीमध्ये ऑनलाईन घेण्यात आलेली होती. सदर चाचणीस २,३९,७३० उमेदवारांनी नोंदणी केली होती, त्यापैकी २,१६,४४३ उमेदवार चाचणीस प्रविष्ट होते. या चाचणीस प्रविष्ट उमेदवारांना स्व-प्रमाणपत्र तयार करण्यासाठी या पोर्टलद्वारे सुविधा देण्यात आलेली होती. या संकेतस्थळावर दिलेल्या मुदतीत स्व-प्रमाणपत्र (Self Certified copy) पूर्ण केलेल्या उमेदवारांनाच या प्रक्रियेत सहभागी होता येईल व फक्त त्यांनाच लॉगिन उपलब्ध होईल. उमेदवारांना प्राधान्यक्रम Generate करण्याची सुविधा दिनांक ०५/०२/२०२४ पासून उपलब्ध करून देण्यात येत आहे.

Pavitra Portal Recruitment 2024 : उमेदवारांनी पोर्टलवर उपलब्ध करून दिलेल्या जाहिरातींचा अभ्यास करावा. सदर जाहिराती उमेदवारांना संकेतस्थळावरील Home page वर Download या मेनूमध्ये पाहता येतील. मुलाखतीशिवाय (Without Interview) व मुलाखतीसह (With Interview) या दोन्ही प्रकारच्या जाहिराती स्वतंत्रपणे उपलब्ध आहेत. प्राधान्यक्रम Generate करून ते लॉक करण्यासाठी उमेदवारांना User Manual for Preference Generation TAIT 2022 या नावाने Home page वर User Manual या मेनूमध्ये देण्यात आलेले आहे.

उमेदवारांना लॉगिन केल्यानंतर Generate Preference या मेनूचा वापर करून मुलाखतीशिवाय (Without Interview) व मुलाखतीसह (With Interview) या दोन्ही प्रकारच्या प्राधान्यक्रमांची यादी स्वतंत्रपणे Generate करता येईल. प्राधान्यक्रम Generate केल्यानंतर Generate झालेल्या प्राधान्यक्रमावावत आवश्यक ती खात्री करतील.

मुलाखतीशिवाय (Without Interview) व मुलाखतीसह (With Interview) या दोन्ही प्रकारच्या पर्यायासाठी पात्र उमेदवारांना प्राधान्यक्रम Generate होतील. या दोन्ही प्रकारच्या नियुक्तीचे प्राधान्यक्रम उमेदवार Generate a lock करू शकतील. उमेदवारांना प्राधान्यक्रम लॉक करण्यासाठी दिनांक ०८/०२/२०२४ ते ०९/०२/२०२४ असा कालावधी देण्यात येत आहे.

Pavitra Portal Recruitment 2024 : उमेदवारांनी User Manual मध्ये नमूद केल्यानुसार प्राधान्यक्रम lock करण्याची कार्यवाही वगळून इतर सर्व कार्यवाही पूर्ण करावी. प्रत्यक्ष Lock करण्याची सुविधा दिल्यानंतर प्राधान्यक्रम lock करावेत. उमेदवारांनी विहित मुदतीत प्राधान्यक्रम लॉक करावेत. उमेदवारांना मुलाखतीशिवाय (Without Interview) व मुलाखतीसह (With Interview) या दोन्ही प्रक्रियेत सहभागी व्हावयाचे असल्यास दोन्ही प्रकारचे प्राधान्यक्रम जनरेट करून लॉक करणे बंधनकारक आहे. जे उमेदवार प्राधान्यक्रम Generate करून lock करणार नाहीत, ते उमेदवार निवडीच्या कोणत्याही टप्प्यावर विचारात घेतले जाणार नाहीत.