अमरावती महावितरणमध्ये अप्रेंटीस पदाची भरती सुरु, अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा.

Apprenticeship Jobs

Amaravati Apprenticeship Jobs 2023 : महाराष्ट्र राज्य, वि. वि. कं. मर्या, अमरावती ग्रामीण विभागा अंतर्गत सत्र २०२३-२०२४ करीता ऑनलाईन पध्दतीने खालील व्यवसायाकरीता शिकाऊ उमेदवारांची प्रशिक्षणाकरीता निवड करावयाची आहे, गुणवत्तेनुसार निवड झालेल्या शिकाऊ उमेदवारांना अमरावती ग्रामीण विभागाच्या खालील तालुकांमध्ये कार्यक्षेत्र व्हावे लागेल.

  • अमरावती तालुका
  • भातकुलो तालुका
  • चांदूर रेल्वे तालुका
  • धामणगांव रेल्वे तालुका
  • नांदगांव खंडेश्वर तालुका
  • तिवसा तालुका

येथे प्राशिक्षणासाठी दिले जाईल. शिकाऊ उमेदवारांची पदसंख्या - विजतंत्री (Electrician) ३२, तारतंत्री (Lineman)-३२ व कोपा-पासा- ५ एकुण ६९ रिक्त जागा आहेत.

Apprenticeship Jobs

हे सुद्धा वाचा : Asus च्या नवीन गेमिंग फोनचा ट्रेलर रीलीज, 24GB RAM सह असणार आहे हा

Apprenticeship Jobs शैक्षणिक अर्हता :- 

  • महाराष्ट्र राज्य माध्यामिक व उच्च माध्यामिक शिक्षण मंडळ १०+२ बंधामधील माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परिक्षा किंवा तत्सम परिक्षा उतीर्ण असणे आवश्यक आहे.
  • राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद नवी दिल्ली मान्यता प्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमधुन विजतंत्री व कोपा/ पासा व्यवसायात उतीर्ण झालेला असावा. अथवा महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास मंडळ MSBTE या बोर्डाचा डिप्लोमामार्फत इलेक्ट्रिशन दोन वर्ष अभ्यासक्रम समकक्ष असल्यामुळे विजतंत्री व तारतंत्री शिकाऊ उमेदवार शुध्दा अर्ज करण्याकरीता पात्र समजण्यात येईल.

Apprenticeship Jobs उमेदवारांसाठी महत्त्वाच्या अटी व शर्ती :-

  1. वयोमर्यादा सर्वसाधारण उमेदवारासाठी किमान १८ वर्ष पुर्ण व कमाल ३० वर्ष असावे. राखीव उमेदवाराकरीताा वयाची अट ०५ वर्ष शिथीलक्षम राहील. त्याकरीता उमेदवाराने राखीव गटातील जातीचे प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक राहील.
  2. केवळ अमरावती जिल्हातील रहीवाशी असलेल्या (आधार कार्डवरील पत्ता अमरावती जिल्ह्यामधील असावा) उमेदवारांचाच प्रशिक्षणासाठी विचार केला जाईल.
  3. अमरावती जिल्हाच्या व्यतिरिक्त इतर जिल्हातील अर्जाचा विचार केला जाणार नाही.
  4. प्रशिक्षण कालावधी ०१ वर्ष असेल.
  5. विद्यावेतन नियमाप्रमाणे मिळेल.
  6. ऑनलाईन अर्ज करतांना एस.एस.सी. उत्तीर्ण गुणपत्रिकामध्ये नमुद केलेले नांव व जन्मतारीख हे आधार कार्डवर नमुद असलेल्या नावाशी व जन्मतारखेशी सुसंगत असावे. तसेच सद्यास्थितीत कार्यान्वित असलेला ई-मेल आय.डी. व भ्रमणध्वनी क्रमांक ऑनलाईन अचूक नमुद करावा.
  7. संगणक प्रणालीमार्फत केलेल्या अर्जाची प्रत व आय.टी.आय. उत्तीर्ण प्रमाणपत्र व चारही सेमिस्टर गुणपत्रिका स्वः साक्षांकित करून या कार्यालयात सादर करणे आवश्यक आहे.
  8. इच्छुक पात्र उमेदवारांनी https://apprenticeshipindia.gov.in या संकेत स्थळावर ऑनलाईन अर्ज जाहितरातीच्या दिनांकापासून ते दि. १२.१२.२०२३ पर्यंत या कार्यालयाचा आस्थपना क्र. E10162702274 यावरच योग्य व परिपुर्ण माहितीसह प्रविष्ट करणे आवश्यक आहे. विहीत मुदतीनंतर सादर केलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाही.
  9. ऑनलाईन नोंदणी अर्जाची प्रत, शैक्षणिक मुळ कागदपत्रे व आधारकार्ड कार्यकारी अभियंता, म.रा.वि.वि.कं, मर्या, अमरावती ग्रामीण विभाग मेजर स्टोअर संकुल पॉवर हाऊस, वेलकम पॉईन्ट, अमरावती मोर्शी रोड, अमराबती येथे दि. १९/१२/२०२३ ते दि. २१/१२/२०२३ सायंकाळी ५.०० वाजेपर्यंत अर्ज स्वतः सादर करणे आवश्यक आहे.
  10. शिकाऊ उमेदवार यांची निवड आय.टी.आय. चे गुण विचारात घेऊन केवळ गुणवत्तेनुसार निवड यादी तयार करुन शिकाऊ उमेदवारांची निवड करण्यात येईल.
  11. उपरोक्त संकेत स्थळावर या विभागाशी संबंधीत आस्थापना क्रमांक E10162702274 च्या व्यतिरिक्त दुसऱ्या आस्थापना क्रमांकावर भरलेले अर्ज स्विकारल्या जाणार नाही.
  12. जाहीरातील अंशतः बदल किवा संपुर्ण जाहीतरात रद्द करण्याचे अधिकार कंपनी राखुन ठेवीत आहे.