पालकांनी ह्या सूचना वाचल्या का ? RTE च्या प्रवेशाची आज आहे शेवट तारीख....

RTE Admission 2023-24

RTE Admission 2023-24 | RTE च्या प्रवेशासाठी RTE च्या अधिकृत वेबसाईटने पालकांसाठी काही महत्वाच्या सूचना जारी केल्या आहेत. पालकांनी खाली दिलेल्या महत्वाच्या सूचनांचे अनुसरण करावे.

RTE Admission 2023-24 | आरटीई महाराष्ट्र प्रवेश 2023-24 हे महाराष्ट्रातील दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण देण्यासाठी महाराष्ट्रातील खाजगी शाळांमधील 25% जागांवर प्रवेश आहे. महाराष्ट्र RTE Admission 2023-24 हे शिक्षण हक्क कायद्यानुसार आहेत. शालेय शिक्षण आणि क्रीडा विभाग महाराष्ट्रात आरटीई कायद्याची अंमलबजावणी आणि त्यानंतरच्या आरटीई प्रवेश महाराष्ट्रात पाहतो. त्यामुळे अर्जाचा फॉर्म, तारीख, RTE प्रवेश 2023-24 महाराष्ट्र लॉटरी निकाल अधिकृत वेबसाइट rte25admission.maharashtra.gov.in आणि विभागाच्या इतर पोर्टलवर घोषित केला जातो.

RTE Admission 2023-24 | आरटीई 25 टक्के प्रवेश पोर्टलवर अतिरिक्त भार येत असल्याने पालकांना तांत्रिक अडचणी येत असल्याचे निदर्शनास येत आहे तरी याबाबत पालकांनी कोणतीही भीती /संभ्रम बाळगू नये. तसेच ज्या बालकांची प्रवेशासाठी सोडत ( लॉटरी )द्वारे निवड झाली आहे अशा बालकांना शाळा प्रवेशाकरिता पुरेसा कालावधी देण्यात येईल.

RTE Admission 2023-24

आर. टी. ई 25% चे ऑनलाईन प्रवेश अर्जाची स्थिती पाहत असताना सर्व्हरच्या क्षमतेपलीकडे जाऊन पोर्टल स्लो होऊ शकते त्यामुळे पालकांनी संभ्रमात न पडता काही वेळाने पुन्हा प्रयत्न करावा.

  • निवड यादीतील प्रवेश पात्र बालकांनी पडताळणी समितीकडे जाऊन प्रवेश घेण्याची मुदत 13 एप्रिल 2023 पासून 08 मे 2023 पर्यंत आहे.
  • निवड यादीतील प्रवेश पात्र बालकाच्या पालकांनी आरटीई पोर्टलवरील अर्जाची स्थिती या टॅब वर आपला अर्ज क्रमांक लिहून ऍडमिट कार्ड ची प्रिंट काढावी तसेच हमी पत्राची प्रिंट देखील घेऊन जावी.
  • ऍडमिट कार्ड काढण्यासाठी पालकांनी लॉगिन करू नये पोर्टलवर दिलेल्या अर्जाची स्थिती या टॅबचाच वापर करावा
  • अर्ज भरताना जी कागदपत्रे नोंदवली आहेत त्या सर्व कागदपत्रांच्या मूळ प्रति व साक्षांकित प्रति पडताळणी समितीकडे जाऊन विहित मुदतीत आपला प्रवेश ऑनलाइन निश्चित करावा आपला प्रवेश ऑनलाईन निश्चित झाला आहे याची रिसीट पडताळणी समितीकडून घेणे आवश्यक आहे.
  • प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांनी अर्जाची स्थिती या टॅब वर आपला अर्ज क्रमांक लिहून प्रतीक्षा यादीतील आपला नंबर पहावा.
  • निवड यादीतील विद्यार्थ्यांनी प्रवेश घेण्याची मुदत संपल्यानंतर मगच प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना अनुक्रमे एसएमएस पाठवले जातील.

RTE Admission 2023-24

हेही वाचा :  दहावी वरून निघालेल्या या CRPF च्या महाभ्ररतीस तुम्ही अर्ज केला का ? हि आहे