अमरावती महावितरणमध्ये अप्रेंटीस पदाची भरती सुरु, अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा.
09/12/2023 - 16:04
Amaravati Apprenticeship Jobs 2023 : महाराष्ट्र राज्य, वि. वि. कं. मर्या, अमरावती ग्रामीण विभागा अंतर्गत सत्र २०२३-२०२४ करीता ऑनलाईन पध्दतीने खालील व्यवसायाकरीता शिकाऊ उमेदवारांची प्रशिक्षणाकरीता निवड करावयाची आहे, गुणवत्तेनुसार निवड झालेल्या शिकाऊ उमेदवारांना अमरावती ग्रामीण विभागाच्या खालील तालुकांमध्ये कार्यक्षेत्र व्हावे लागेल.
- अमरावती तालुका
- भातकुलो तालुका
- चांदूर रेल्वे तालुका
- धामणगांव रेल्वे तालुका
- नांदगांव खंडेश्वर तालुका
- तिवसा तालुका
येथे प्राशिक्षणासाठी दिले जाईल. शिकाऊ उमेदवारांची पदसंख्या - विजतंत्री (Electrician) ३२, तारतंत्री (Lineman)-३२ व कोपा-पासा- ५ एकुण ६९ रिक्त जागा आहेत.
हे सुद्धा वाचा : Asus च्या नवीन गेमिंग फोनचा ट्रेलर रीलीज, 24GB RAM सह असणार आहे हा
Apprenticeship Jobs शैक्षणिक अर्हता :-
- महाराष्ट्र राज्य माध्यामिक व उच्च माध्यामिक शिक्षण मंडळ १०+२ बंधामधील माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परिक्षा किंवा तत्सम परिक्षा उतीर्ण असणे आवश्यक आहे.
- राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद नवी दिल्ली मान्यता प्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमधुन विजतंत्री व कोपा/ पासा व्यवसायात उतीर्ण झालेला असावा. अथवा महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास मंडळ MSBTE या बोर्डाचा डिप्लोमामार्फत इलेक्ट्रिशन दोन वर्ष अभ्यासक्रम समकक्ष असल्यामुळे विजतंत्री व तारतंत्री शिकाऊ उमेदवार शुध्दा अर्ज करण्याकरीता पात्र समजण्यात येईल.
Apprenticeship Jobs उमेदवारांसाठी महत्त्वाच्या अटी व शर्ती :-
- वयोमर्यादा सर्वसाधारण उमेदवारासाठी किमान १८ वर्ष पुर्ण व कमाल ३० वर्ष असावे. राखीव उमेदवाराकरीताा वयाची अट ०५ वर्ष शिथीलक्षम राहील. त्याकरीता उमेदवाराने राखीव गटातील जातीचे प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक राहील.
- केवळ अमरावती जिल्हातील रहीवाशी असलेल्या (आधार कार्डवरील पत्ता अमरावती जिल्ह्यामधील असावा) उमेदवारांचाच प्रशिक्षणासाठी विचार केला जाईल.
- अमरावती जिल्हाच्या व्यतिरिक्त इतर जिल्हातील अर्जाचा विचार केला जाणार नाही.
- प्रशिक्षण कालावधी ०१ वर्ष असेल.
- विद्यावेतन नियमाप्रमाणे मिळेल.
- ऑनलाईन अर्ज करतांना एस.एस.सी. उत्तीर्ण गुणपत्रिकामध्ये नमुद केलेले नांव व जन्मतारीख हे आधार कार्डवर नमुद असलेल्या नावाशी व जन्मतारखेशी सुसंगत असावे. तसेच सद्यास्थितीत कार्यान्वित असलेला ई-मेल आय.डी. व भ्रमणध्वनी क्रमांक ऑनलाईन अचूक नमुद करावा.
- संगणक प्रणालीमार्फत केलेल्या अर्जाची प्रत व आय.टी.आय. उत्तीर्ण प्रमाणपत्र व चारही सेमिस्टर गुणपत्रिका स्वः साक्षांकित करून या कार्यालयात सादर करणे आवश्यक आहे.
- इच्छुक पात्र उमेदवारांनी https://apprenticeshipindia.gov.in या संकेत स्थळावर ऑनलाईन अर्ज जाहितरातीच्या दिनांकापासून ते दि. १२.१२.२०२३ पर्यंत या कार्यालयाचा आस्थपना क्र. E10162702274 यावरच योग्य व परिपुर्ण माहितीसह प्रविष्ट करणे आवश्यक आहे. विहीत मुदतीनंतर सादर केलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाही.
- ऑनलाईन नोंदणी अर्जाची प्रत, शैक्षणिक मुळ कागदपत्रे व आधारकार्ड कार्यकारी अभियंता, म.रा.वि.वि.कं, मर्या, अमरावती ग्रामीण विभाग मेजर स्टोअर संकुल पॉवर हाऊस, वेलकम पॉईन्ट, अमरावती मोर्शी रोड, अमराबती येथे दि. १९/१२/२०२३ ते दि. २१/१२/२०२३ सायंकाळी ५.०० वाजेपर्यंत अर्ज स्वतः सादर करणे आवश्यक आहे.
- शिकाऊ उमेदवार यांची निवड आय.टी.आय. चे गुण विचारात घेऊन केवळ गुणवत्तेनुसार निवड यादी तयार करुन शिकाऊ उमेदवारांची निवड करण्यात येईल.
- उपरोक्त संकेत स्थळावर या विभागाशी संबंधीत आस्थापना क्रमांक E10162702274 च्या व्यतिरिक्त दुसऱ्या आस्थापना क्रमांकावर भरलेले अर्ज स्विकारल्या जाणार नाही.
- जाहीरातील अंशतः बदल किवा संपुर्ण जाहीतरात रद्द करण्याचे अधिकार कंपनी राखुन ठेवीत आहे.
हे सुध्दा वाचा